[२४१]
काळ जातो प्रतिक्षण |
तुज येईल मरण ||१||
अंती राहिले सवंगडे |
एकले चि जाणे पडे ||२||
आप्त इष्ट गण-गोत |
सर्वे नाही कोणी येत ||३||
स्वामी म्हणे तू एकला |
जाग जाग स्व-हिताला ||४||
[२४२]
ओळखी स्व-रूप नको होऊं भ्रांत |
अनादि अनंत आहेसी तूं ||१||
देह मिळे अंती पंच-महाभूती |
स्थिती त्यापरती असे तुझी ||२||
नामरूपात्मक मायिक संसार |
नित्य निर्विकार तूं चि एक ||३||
स्वामी म्हणे सोडी सोडी देहाहंता |
सुखे भोगीं सत्ता सोsहं-रूप ||४||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment