Tuesday, June 7, 2011

[२०१]
प्रपंचाचा त्रास न साहे जीवास |
नको येथें वास ऐसे वाटे ||१||
म्हणे रांडा पोरे मरती तरी बरें |
मज ह्या संसारे गांजिलेंसे ||२||
वैतागला प्राणी ऐसे मनीं आणी |
निघावें सोडोनी घर-दार ||३||
स्वामी म्हणे मन झालें पराधीन |
नव्हे हे लक्षण वैराग्याचें ||४||

[२०२]
क्षणोक्षणीं हा चि करावा विवेक |
काय तें मायिक काय सत्य ||१||
नाम रूप गुण मिथ्या नाशिवंत |
एक तें शाश्वत आत्म-पद ||२||
विषयांचें सुख नश्वर मायिक |
तेथें अरोचक असो द्यावें ||३||
स्वामी म्हणे माळ घालिते विरक्ती |
बळावतां प्रीती आत्म-रुपी ||४||

No comments:

Post a Comment