Wednesday, June 29, 2011

[२४५]
नको देह-दंड नको व्रत-नेम |
पाहे आत्माराम अंतर्यामी ||१||
नको हिंडूं तीर्थ नको धुंडू रान |
राहे दया-घन अंतर्यामीं ||२||
नाम तेथे राम भक्तांचा आराम |
निष्कामांचा काम नांदतसे ||३||
अंतरीं चि नाम अंतरीं चि राम |
अंतरीं विश्वास स्वामी म्हणे ||४||

[२४६]
जेथें जेथें माझें हिंडेल हें मन |
तुझे चि दर्शन तेथे होवो ||१|
तुजविण देवा न दुजी वासना |
शिवो माझ्या मना कदा काळी ||२||
वाहो माझें मन तुझा चि संकल्प |
तेणे आपेंआप स्थिरावेल ||३||
स्वामी म्हणे माझी पूर्ण करीं आस |
ना तरी उदास जिणे वाटे ||४||

No comments:

Post a Comment