Saturday, June 4, 2011

[१९५]
नको नको मना दुर्जन-संगति |
तेणे रमा-पति अंतरेल ||१||
नको नको मना पाखंड-दर्शन |
तेणे नारायण अंतरेल ||२||
नको नको मना अभक्तांच्या गोष्टी |
तेणे जगजेठी अंतरेल ||३||
स्वामी म्हणे मना धरीं संत-संग |
करी रमा-रंग आपुलासा ||४||

[१९६]
मागणे हे एक देई भक्ति-प्रेम |
देवा तुझें नाम गाईन मी ||१||
आवडीनें देवा गुण मी वर्णीन |
प्रेमें न्याहाळीन रूप तुझें ||२||
भक्ति-भावें तुझे करीन पूजन |
अंतरी चिंतन निरंतर ||३||
स्वामी म्हणे पायी ठेवीन मी माथा |
तेणें माझ्या चित्त समाधान ||४||

No comments:

Post a Comment