[२३५]
घेई घेई जीव स्व-रूपाचा ध्यास |
पुरे हा हव्यास प्रपंचाचा ||१||
विटे ऐसी गोडी नव्हे स्व-रुपाची |
सांगती ऐसें चि साधु-संत ||२||
संतांचे वचनीं ठेवोनी विश्वास |
करीं गा अभ्यास आवडीनें ||३||
स्वामी म्हणे भावे भोगीं आत्मानंद |
अवीट अखंड शांति-रूप ||४||
[२३६]
नको होऊं मना इंद्रियांचा दास |
प्रपंची उदास राहें सदा ||१||
हरि-पायीं भावे ठेवीं एक-निष्ठ |
न मानीं वरिष्ठ दुजे काही ||२||
लौकिकाचा संग दु:खासी कारण |
करी नागवण स्व-हिताची ||४||
स्वामी म्हणे होई हरि-पायीं लीन |
तरी चि कल्याण पावसील ||५||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment