Wednesday, June 22, 2011

[२३१]
लोळे विषयांत चंचळ हे चित्त |
न राहे निवांत क्षणभरी ||१||
म्हणुनी काकुळती आलो तुझ्या दारी |
तारीं किंवा मारीं पांडुरंगा ||२||
आता तुझे पाय न सोडीं विठ्ठला |
जावो जरी गेला जीव माझा ||३||
स्वामी म्हणे मज तुजविण त्राता |
नसे चि अनंता दुजा कोणी ||४||

[२३२]
येई रखुमाईच्या वरा |
हात देईं ह्या पामरा ||१||
बुडालों मी भव-सागरीं |
धांव पाव ग लौकरी ||२||
नको पाहूं माझा अंत |
मी तों अजाण पतित ||३||
मज नेईं पैल तीरा |
तूं चि पतित-पावन खरा ||४||
स्वामी म्हणे उडी घाली |
ब्रीद आपुलें सांभाळी ||५||

No comments:

Post a Comment