[२२३]
असो सार्वभौम राजा चक्रवर्ती |
चुके चि ना अंती काळ-पाश ||१||
असो बाळ-वृद्ध असो नारी-नर |
भ्याड किंवा शुर असो कोणी ||२||
पंडित अजाण सज्जन दुर्जन |
सधन निर्धन असो कोणी ||३||
असो सुलक्षण सुरूप तरुण |
टळे ना मरण कोणासी हि ||४||
स्वामी म्हणे एक जगी आत्म-ज्ञानी |
मृत्यूतें मारुनी राहिलासे ||५||
[२२४]
काळाची गर्जना नये कानावरी |
जोंवरी शरीरीं बलोन्माद ||१||
प्रपंचांत सौख्य मानी मूढपणे |
न जाणे खेळणें काळाचें ते ||२||
होता शक्तिहीन शरीर तें क्षीण |
राहेल मरण डोळ्यांपुढें ||३||
स्वामी म्हणे अंतीं घडे पश्चात्ताप |
काळाची झडप पडे जेव्हा ||४||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment