Wednesday, June 8, 2011

[२०३]
प्रपंच असावें उदास वर्तन |
आवरावे मन विवेकानें ||१||
असो घरदार कुटुंब संसार |
नये त्याचा भार वाटों देवों ||२||
सुखे वैराग्याचा करावा अभ्यास |
प्रपंचाचा त्रास मानूं नये ||३||
स्वामी म्हणे देही न जावें गुंतून |
हि चि असे खुण वैराग्याची ||४||

[२०४]
तो चि एक भक्त नव्हे जो विभक्त |
राहे योग-युक्त अखंडित ||१||
होऊनियां देव करी देव पूजा |
जरी तो सायुज्य पातला चि ||२||
साधिलें स्व-हित गाठिलें अद्वैत |
तरी भक्ती-पंथ सोडी चि ना ||३||
स्वामी म्हणे भक्त ईश्वराचा प्राण |
ईश्वर प्रमाण भक्तातें हि ||४||

No comments:

Post a Comment