Thursday, June 9, 2011

[२०५]
न होती ते भक्त उच्चारूनी नाम |
पोटीं क्रोध काम असे जरी ||१||
न होती ते भक्त करितां कीर्तन |
दंभ मोह मान वसे जरी ||२||
न होती ते भक्त घालोनियां माळा |
भक्तीचा जिव्हाळा नसे जरी ||३||
स्वामी म्हणे व्यर्थ पूजा घंटा-नाद |
भेटे ना गोविंद भक्तीविण ||४||

[२०६]
उच्चारिता नाम आनंदले मन |
दाटले लोचन प्रेमाश्रूंनी ||१||
घामेजली काय झाली रोमांचित |
थरारे कंपित होवोनिया ||२||
कंठ सद् गदित स्तब्ध झालें चित्त |
होती विगलित सर्व गात्रें ||३||
स्वामी म्हणे अंती गेले देह-भान |
प्रेमे होता लीन आत्म-रुपीं ||४||

No comments:

Post a Comment