Sunday, June 19, 2011

[२२५]
जेणे अंतरती हरि तुझे पाय |
करावे ते काय चमत्कार ||१||
कशासाठ व्हावी वश ऋद्धी सिद्धी |
नांवाची प्रसिद्धी कशासाठी ||२||
मज तृणवत हें प्राकृत |
आहे आत्म-हित तुझे पायी ||३||
स्वामी म्हणे माझे एक तूं निधान |
नाही समाधान तुजविण ||४||

[२२६]
हरि तुझी मूर्ति दिसे सर्व भूतीं |
असे तुझी वस्ती चराचरीं ||१||
तुजविण ठाव नसे अणुमात्र |
व्यापुनी सर्वत्र राहिलासी ||२||
काय वर्णू तुझें नाम रूप गुण |
सगुण निर्गुण तूं चि एक ||३||
स्वामी म्हणे तूं चि विश्वाचे जीवन |
समर्पिले मन तुझ्यापायीं ||४||

No comments:

Post a Comment