[२११]
भूत-भविष्याचे भान |
आम्ही नेणों वर्तमान ||1||
सदा सर्वकाळ जाण |
आत्म-रुपीं सावधान ||२||
आम्ही ठाई चि निर्गुण |
आम्हां कैचें जन्म-मरण ||३||
स्वामी म्हणे आत्म-पणें |
आम्हा सर्वत्र नांदणें ||४||
[२१२]
जरी होय शुद्ध चित्त |
तरी विषाचे अमृत ||१||
येई माराया धांवोन |
तो चि करी संरक्षण ||२||
जन-निंदेची भूषणें |
होती विघ्नांची सुमने ||३||
नाना आघात आपत्ति |
ती हि सौख-फल देती ||४||
स्वामी म्हणे शत्रू मित्र |
आत्म-रूप ते सर्वत्र ||५||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment