[२०७]
घर दार अन्न वस्त्र-प्रावरण |
अधिक त्याहून काय हवे ||१||
दार सुत धन आप्त-इष्ट-जन |
अधिक त्याहून काय हवे ||२||
देह आणि मन आरोग्य-संपन्न |
अधिक त्याहून काय हवे ||3||
संतांचे पूजन ईश्वराचे ध्यान
अधिक त्याहून काय हवे ||4||
स्वामी म्हणे व्हावे विश्वाचे कल्याण
तेणें समाधान मज होय ||५||
[२०८]
जरी तो दर्दुर सर्प-मुखीं गेला|
तरी आस त्याला मासियेची ||१||
तैसे प्राणियासी न सोडवे तृष्णा |
लागलीसे प्राणा तांत जरी ||२||
घडी घडी काळ भक्षितो आयुष्य |
परी ह्याचें लक्ष प्रपंचात ||३||
स्वामी म्हणे जीव होईं गा सावध |
घेईं वेगें वेध माधवाचा ||४||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment