Tuesday, March 1, 2011

[३८]
चित्त असों द्यावें निवांत प्रसन्न |
कल्पांती हि खिन्न होऊं नये ||१||
अंतरी असावा अखंड उल्हास |
आपत्तीचा त्रास मानूं नये ||२||
संसारी रहावे अलिप्त उदास |
मोहे माया-पाश जोडूं नये ||३||
स्वामी म्हणे व्हावा ईश्वरी विश्वास |
संतांचा सहवास सोडूं नये ||४||

[३९]
'नेति' 'नेति' ऐसें बोलती ते वेद |
जाहले नि:शब्द पर-तत्वीं ||१||
मोकळें न बध्द एकलें न दुजें
नांदतें सहजें आत्म-पणे ||२||
शून्य ना संपूर्ण मूर्त न अमूर्त |
भावाsभावातीत महाशून्य ||३||
ते चि आम्हा भलें अंतरी लाभले |
गुरु-कृपा-बळें स्वामी म्हणे ||४||

No comments:

Post a Comment