[७२]
अंतरी स्वानंद असे स्वयंसिद्ध |
परी मति-मंद भोगी चि ना ||१||
समाधी-निधन असता सन्निध |
झालासे मोहांध पाहे चि ना ||२||
अखंड भजन चाले रांत्र -दिन |
तेथे सावधान राहे चि ना ||३||
सद् गुरु वाचून नाही आत्म-ज्ञान |
जाईना शरण स्वामी म्हणे ||४||
[७३]
प्रपंचाकारणे केली आटापीट |
परी यातायात चुके चि ना ||१||
माझें माझें म्हणुनी बांधियलें गांठी |
परी ते शेवटी कामा नये ||२||
कन्या पुत्र वित्त आप्त गण-गोत |
सांडुनी समस्त जावें लागे ||३||
हरि-नाम एक येईल सांगाती |
तारील तें अंती स्वामी म्हणे ||४||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment