Thursday, March 10, 2011

[५६]
काम-क्रोधलोभ-दार हें तिहेरी |
घोर यम-पुरी पाववितें ||१||
तेणें आत्म-नाश होतसे निभ्रांत |
सांगतो श्री-कांत गीतेमाजीं ||२||
सोडी आडवाट धरी जो सत्पंथ |
दृढ-भावें चित्त देवोनियां ||३||
आत्म्याचें कल्याण साधुनी तो जाण |
पावतो निर्वाण स्वामी म्हणे ||४||

[५७]
कधीं खाई तूप-रोटी
कधी राहे अर्धपोटी ||१||
कधीं झोपे गादीवरी |
कधीं घोंगडी अंथरी ||२||
कधीं लोकरीची शाल |
कधीं पांघरी वाकळ ||३||
कधीं हवेली सुंदर |
कधीं चंद्र -मौळी घर ||४||
कधीं सज्जनांची भेट |
कधीं नाठाळाशीं गाठीं ||५||
कधीं गळा पुष्प-हार |
कधीं निंदेचा भडिमार ||६||
कधीं सुखाचा संसार |
कधीं हिंडे दारोदार ||७||
स्वामी म्हणे आत्म-स्थित |
संत सुख दु:खातीत ||८||

No comments:

Post a Comment