Monday, March 28, 2011

[९२]
रूप चतुर्भुज तुवां चक्र-पाणि |
ध्रुव मधु-वनीं दाविले जे ||१||
तें चि देखावया भुकेले हे डोळे |
काय सांगो झाले उतावीळ ||२||
लडिवाळपणें घेतलीसे आळी |
बाळ मी माउली तूं चि माझी ||३||
तुजपासी आता काय धरूं भीड |
पुरवीं माझे लाड स्वामी म्हणे ||४||

[९३]
रूप तुझे देवा दाखवीं केशवा |
मुकुंद माधवा नारायणा ||१||
अच्युता अनंता कृष्ण दामोदरा |
गोविंदा श्रीधरा ह्रषीकेशा ||२||
हरि-जनार्दना रुक्मिणी-रमणा |
देवकी-नंदना वासुदेवा ||३||
स्वामी म्हणे मज हा चि निदिध्यास |
पूर्ण करीं आस दर्शनाची ||४||

No comments:

Post a Comment