Friday, March 11, 2011

[५८]
बाळपणीं खेळ यौवनी विलास |
वार्धक्यीं जीवास व्याधी चिंता ||१||
बाळपणीं शाळा तारुण्यीं संसार |
वार्धक्यीं जोजार तयाचा चि ||२||
जन्मुनियां वायां कष्टविली काया |
स्व-हित साधाया वेळ नाही ||३||
स्वामी म्हणे मोहें विसरला देव |
तयासी विसावा कैंचा अंती ||३||
[५९]
बाळकाची भूक कळे माउलीतें |
बोलावुनी देते स्तन-पान ||१||
तैसें माझें हित जाने जगन्नाथ |
तेणे मी निश्चिंत सर्वकाळ ||२||
भाव-बळें देव आपुलासा केला |
कृपाळु तो भला सांभाळितो ||३||
स्वामी म्हणे खेळ खेळतो लडिवाळ |
खेळवी गोपाळ प्रेम-भरें ||४||

No comments:

Post a Comment