Wednesday, March 9, 2011

[५४]
बैसे अधांतरी उभा अग्नीवरी |
सांगे देशांतरी काय चाले ||१||
बोले तें तें घडे ऐसे चि रोकडे |
दावी लोकांपुढे चमत्कार ||२||
वश केल्या सिद्धी पावला प्रसिद्धी |
लागली उपाधी लौकिकाची ||३||
स्वामी म्हणे नाहीं आत्म-साक्षात्कार |
काय चमत्कार दावोनियां ||४||

[५५]
दावी चमत्कार त्यासी नमस्कार |
लोक-व्यवहार ऐसा असे ||१||
स्वभावें साचार रची चराचर |
त्याचा जयजयकार कोण करी ||२||
स्व-रूपीं विलीन साधू-संत-जन |
तयांचे चरण कोण धरी ||३||
स्वामी म्हणे जना कृत्रिमाची गोडी |
नसे चि आवडी स्वाभाविकीं ||४||

No comments:

Post a Comment