[४६]
सोडिला संसार जोडिला संन्यास |
पालटिला वेष बाह्यात्कारीं ||१||
अंतरी मी-माझे बाळगिले ओझें |
तरी ती सहजे विटंबना ||२||
वाटला संन्यास घ्यावा ज्या कारणे |
तेथें लक्ष उणे कामा नये ||३||
स्वामी म्हणे मन होतां कृष्णार्पण
संसारी असोन संन्यासी तो ||४||
[४७]
करी थोडे बोले फार
त्याचा बुडाला संसार ||१||
वस्तु विकी जो उधार |
त्याचा बुडाला व्यापार ||२||
विचारी ना सारासार |
त्याचा बुडाला आचार ||३||
स्वामी म्हणे अहंकार |
तेथे कैंचा आत्मोद्धार ||४||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment