[५०]
हरि-नामाचे पवाडे |
गातां सनकादिक वेडे ||१||
तेथे मी एक बापुडें |
किती गाऊं वाडेंकोडें ||२||
हरि-नामाची महती |
गातां वेद मौनावती ||३||
तेथे काय माझी मति |
स्वामी म्हणे वर्णूं किती ||४||
[५१]
आता काय मज संन्यासाचे काज |
निजांतरीं गुज प्रकटले ||१||
प्रकटतां घडे सहज-संन्यास |
नैष कर्म्य-पदास गांठियेले ||२||
करोनि अकर्ता भोगोनी अभोक्ता |
विश्वीं आत्म-सत्ता नांदतसे ||३||
स्वामी म्हणे आता जाहलों नि:संग |
त्याग आणि भोग दूर ठेले ||४||
Subscribe to:
Post Comments (Atom)
मराठी साहीत्य मला खुप आवडते मला संपर्क करण्यासाठी माझा मो नं 9767567990
ReplyDelete