Tuesday, May 31, 2011

[१८७]
झालो ब्रह्म ऐसें बोलतां अहंता |
स्पर्शे पाहे चित्ता म्हणोनियां ||१||
मन बुद्धीसहित समर्पिले चित्त |
राहिलों निवांत हरिपायीं ||२||
आतां अहं सोsहं मावळलें भान |
अवघें नारायण रूप झालें ||३||
स्वामी म्हणे ऐसें भक्तीचें महिमान |
ओळखावी खूण स्वानुभवें ||४||

[१८८]
नाम-जपे जाप जळोनियां पाप |
होय आपेआप आत्म-शुद्धी ||१||
नाम-जपें जाय काम क्रोध भय |
होय मनोजय अनायासें ||२||
जपा हरि-नाम जपा हरि-नाम |
मार्ग हा सुगम वैकुंठींचा ||३||
स्वामी म्हणे आम्ही नामें चि सबळ |
कांपे कळिकाळ आम्हांपुढे ||४||

No comments:

Post a Comment