Monday, May 23, 2011

[१७५]
गुरु तो ची देव ऐसा ठेवीं भाव |
सद् गुरू -गौरव काय वानूं ||१||
तो चि ज्ञान-मूर्ती ब्रह्मानंद-स्थिती |
देई परा शांती भाविकांते ||२||
भक्ती-भावें जातां तयासी शरण |
होते ओळखण स्व-रुपाची ||३||
स्वामी म्हणे वंदी सद् गुरु-पाऊलें |
भलें आकारले प्र-ब्रह्म ||४||

[१७६]
सोsहं सोsहं ध्यास लागता जीवास |
होतसे निरास संमोहाचा ||१||
त्रिगुणाचे भान हारपे मीपण |
होता सोsहं ध्यान निरंतर ||२||
अंती एकमय ध्याता ध्यान ध्येय |
होता ज्ञानोदय अंतर्यामी ||३||
स्वामी म्हणे मग स्वानंदाचा भोग
होय तो हि साड्ग सुखरूप ||४||

No comments:

Post a Comment