Saturday, May 14, 2011

[१६२]
आठ हि प्रहर संसार व्यवहार |
करी ना विचार दुजा कांही ||१||
नाठविता देव नाचरितां धर्म |
अर्थ आणि काम भोगूं पाहे ||२||
अर्थ अनर्थासी होवुनी कारण |
कामे केला दीन बापुडा तो ||३||
स्वामी म्हणे अंती साधिला ना स्वार्थ |
जिणे गेले व्यर्थ पामराचें ||४||

[१६३]
रामकृष्ण परमहंस |
थोर जगदंबेचा दास ||१||
कालीमातेचे चिंतन |
करी भावें रात्रं-दिन ||२||
जगन्माते संगे बोले |
माता सांगे तैसा चाले ||३||
कालीमातेचा प्रख्यात
भक्त योगी ज्ञानवंत ||४||
स्वामी म्हणे होता भेटी |
नेत्री प्रेमाश्रु दाटती ||५||

No comments:

Post a Comment