Friday, May 27, 2011

[१८३]
आघवा संसार झाला मोक्ष-मय |
होता ज्ञानोदय अंतर्यामी ||१||
लाधले सकल साधनांचे फळ |
भेटला गोपाल अखंडित ||२||
काम क्रोध लोभ निमाले संपूर्ण |
झाले समाधान अनिर्वाच्य ||३||
स्वामी म्हणे आता बैसलो निवांत |
हरिपायी चित्त लावोनिया ||४||

[१८४]
जगीं जो का बळी तो चि कान पिळी |
थोर मासा गिळी लहानतें ||१||
कां गा लुबाडावे दीन असहाय |
साजे का हा न्याय मानवतें ||२||
हे चि काय सांगें बुद्धीचें लक्षण |
करावे भक्षण दुर्बळांचें ||३||
स्वामी म्हणे ज्याचें ध्येय सर्वोदय |
धन्य तो चि होय मानवांत

No comments:

Post a Comment