[१४१]
पाहे कोण कोणा तारी |
कोण कोणते संहारी ||१||
हरिविण चराचरीं |
वस्तु आहे का दुसरी ||२||
कोण सुष्ट कोण दुष्ट |
पुण्यवंत वा पापिष्ट ||३||
स्वामी म्हणे हरि-रूप |
विश्व झालें आपेंआप ||४||
[१४२]
भला देवा तुझ्या रूपासी भाळलो |
वृथा होतों मेलो संसारात ||१||
तुझे पाय मज एक चि विषय |
आतां काय भय प्रपंचाचे ||२||
विश्व चराचर तुझा चि अवतार |
ऐसा साक्षात्कार झाला जीव ||३||
स्वामी म्हणे होय तुझी नित्य भेटी |
पडे पायीं मिठी अखंडित ||४||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment