[१६६]
जनासी घरदार कुटुंब-संसार |
आम्ही दिगंबर ठायीचे चि ||१||
जनासी अधिकार वैभवाची हांव |
आम्हा रूप नांव ते हि नको ||२||
जन अपेक्शिती धन मान कीर्ती |
आम्हांलागीं क्षिती नाहीं त्याची ||३||
स्वामी म्हणे आम्ही झालों कानफाटे |
चालों उफराटे जगामाजीं ||४||
[१६७]
नाथ-संप्रदायी आम्ही कानफाटे |
जाऊं नका वाटे आमुचिया ||१||
मन-पवनाची घालोनियां गांठ |
करूं वाताहत संसाराची ||२||
देहासवें पुसूं लौकीकाचे नांव |
नेदूं उरों ठाव जीवासी हि ||३||
स्वामी म्हणे तुम्हां बुडवू महा-शून्यीं |
गगनासी आटणी होये जेथे ||४||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment