Monday, April 25, 2011

[१३५]
बोलेन तें होवो तुझें चि स्तवन |
चिंतीन ते ध्यान होवो तुझें ||१||
देखेन तें होवो तुझेची दर्शन |
त्वद्रुण-श्रवण ऐकेन ते ||२||
हिंडेन ती होवो तुझ प्रदक्षिणा |
करीन भोजना नैवद्य तो ||३||
घडे जो व्यापार ती चि तुझी पूजा |
होवो केशवराजा स्वामी म्हणे ||४||

[१३६]
निरोगी निर्मळ असावे शरीर |
जाण तें मंदिर देवाजीचे ||१||
मन बुद्धी शुद्ध असों देई नित्य |
ते पूजा-साहित्य देवाजीचें ||२||
सर्वकाळ चित्त ठेवावे पवित्र |
तें चि पूजा-पात्र देवाजीचे ||३||
सोsहं भावें जीव पूजी नारायणा |
सांडूनी मीपणा स्वामी म्हणे ||४||

No comments:

Post a Comment