Monday, April 18, 2011

[१२२]
कृपावंत थोर सद्गुरू उदार |
तेणें योग-सार दिलें मज ||१||
मन-पवनाची दाखवोनी वाट |
गगनाशीं गाठ बांधियेली ||२||
शून्य-नि:शून्याचे बीज महाशून्य |
भेटविलें धन्य हरि-रूप ||३||
स्वामी म्हणे माझा नाथ-संप्रदाय |
अवघे हरीमय योग-बळे ||४||

[१२३]
चढो पालखींत पडो वा आगींत |
देह नाशिवंत मातीमोल ||१||
काया कदा काळीं जाणार जाईल |
सांभाळावे शील जीवें भावे ||२||
देहाची आसक्ती असों नये चित्ती |
वसों द्यावी प्रीती हरिपायी ||३||
स्वामी म्हणे ऐसी करावी प्रार्थना |
देवा नारायणा धांव पाव ||४||

No comments:

Post a Comment