[११२]
भावें राम कृष्ण बोलूं |
प्रेमे कीर्तनांत डोलूं ||१||
मन करोनी तल्लीन |
ध्याऊं हरीचे चरण ||२||
करूं नामाचा गजर |
सुखे होऊं भव-पार ||३||
स्वामी म्हणे रात्रं-दिन |
घेऊं देवाचें दर्शन ||४||
[११३]
खेळविसी तैसा खेळेन साचार |
तूं चि सूत्र-धार बाहुलें मी ||१||
देवा तूं चि धनी मी तुझा चाकर |
तुझा चि आधार मजलागी ||२||
बोलविसी तैसें बोलेन वचन |
मज अभिमान कासयाचा ||३||
काय वाचा मन तुझ्या चि आधीन |
तुझ्या पायीं लीन स्वामी म्हणे ||४||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment