Sunday, April 17, 2011

[१२०]
ध्येयासाठी जगूं सोसूं सुख-दु:खें |
ध्येयासाठीं सुखे वेचूं प्राण ||१||
सत्यासाठीं मारूं स्वार्थावारी लाथ |
लौकिकाची मात दूर ठेवूं ||२||
हरीसाठीं करूं सर्वस्वाचे दान |
झुगारुं बंधन अहंतेचे ||३||
स्वामी म्हणे मन ध्येयीं समर्पून |
होऊं चि आपण ध्येरूप ||४||

[१२१]
धर्म अर्थ काम |
आम्हा एक आत्माराम ||१||
आत्मारामीं मन |
रंगलेंसे रात्रं-दिन ||२||
भक्ती सुखापुढे |
मोक्ष-सुख ते नावडे ||३||
भक्ती लाभता अद्वय |
स्वामी झाला सुखमय ||४||

No comments:

Post a Comment