Wednesday, April 20, 2011

[१२६]
नाहीं पोटीं भूत-दया |
काय झाले शास्त्रे घोकोनियां ||१||
नाहीं अंगी नम्र-पण |
काय विद्या धन मान ||२||
नाहीं नीति न आचार |
काय केला बडिवार ||३||
नाहीं परोपकार -वृत्ति |
काय करावी संपत्ति ||४||
नाहीं क्षमेचा आधार |
काय सत्ता-अधिकार ||५||
नाहीं दुर्बळ-सांभाळ |
काय करावे तें बळ ||६||
नाहीं आत्म-समाधान |
काय करावें तें ज्ञान ||७||
जरी आठवेना देव |
काय संसार-गौरव ||८||
स्वामी म्हणे भाक्तीविणे |
वृथा मानवाचें जिणें

No comments:

Post a Comment