Thursday, April 21, 2011

[१२७]
जन्मोनिया नाही साधिलें स्व-हित |
त्याचे जीवित मातीमोल ||१||
कासया जन्मला आला तैसा गेला |
वायां कष्टविला निज-देह ||२||
सुखासाठी केला संसाराचा धंदा |
भोगिली आपदा नानापरी ||३||
स्वामी म्हणे त्यासी कैचें समाधान |
अंती नागवण सर्वस्वाची ||४||

[१२८]
भाव अंतरी यथार्थ |
देव देणार समर्थ ||१||
करूं धंदा व्यवहार |
स्मरूं सदा सर्वाधार ||२||
कर्ता करविता तो चि |
ऐसी प्रचीती आमुची ||३||
स्वामी म्हणे साक्षीभूत |
सुखे राहूं संसारात ||४||

No comments:

Post a Comment