[११८]
आता काय मज काळाचे भय |
श्रीगुरुचे पाय देखियले ||१||
राहे कैसा देहाचा संबंध |
होता आत्म-बोध अंतर्यामी ||२||
देहाचे व्यापार चालता अलिप्त |
राहे साक्षीभूत सर्वकाळ ||३||
राहो किंवा जावो देह नाशिवंत |
मी तो देहातीत स्वामी म्हणे ||४||
[११९]
सर्व सुखे आली धावत सामोरी |
अंतरी श्रीहरी प्रकटता ||१||
राजे महा-राजे रंक ते बापुडे |
होती आम्हांपुढे सत्ताहीन ||२||
शास्त्र्वेत्ते भले पंडित आगळे |
मीपणे बुडाले सुख-दु:खातीत ||३||
स्वामी म्हणे आम्ही सुख-दु:खातीत |
अंतरी उदित नित्य-सुख ||४||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment