[ १७ ]
कृपावंत भला सद् गुरु लाभला |
अंगीकार केला तेणे माझा ||१||
अंतरींची खुण दाखवोनी मज |
सोsहं -मंत्र गुज सांगितलें ||२||
ठायीं ची लागली अखंड समाधि|
संपली उपाधी अविद्येची ||३||
स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला|
संसार तो झाला मोक्ष-मय ||४||
[ १८ ]
विषयी विरक्ति दया सर्वां भूतीं |
हरिपायीं भक्ति एकनिष्ठ ||१||
अंतरीं जयातें नित्य समाधान |
गेले मोह मान सांडोनियां ||२||
झाली पर-नारी माउलीसमान |
आणिकांचे धन विष-तुल्य ||३||
नेणे पार-निंदा न बोले अनृत |
सर्वा-भूत-हित लक्षी सदा ||४||
संतांचीं लक्षणें वर्णिता अपार |
सांगितलें सार स्वामी म्हणे ||५||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment