[ ३ ]
अंतर्बाह्य राम झालो पूर्ण-काम |
देखियेले ब्रह्म मूर्तिमंत ||१||
आनंदाला जीव भेटला केशव
गेलो भवार्णव तरोनियां ||२||
काम क्रोध लोभ दंभ मोह मान
अवघें नारायण-रूप झालें ||३||
काय वाचा मन केलें कृष्णार्पण |
गेले मी-तू-पण स्वामी म्हणे ||४||
[ ४ ]
निर्भय निश्चित निवांत निरार्त
रतलेंसे चित्ता हरिपायीं ||१||
सांडिला संसार व्हावया उध्दार |
केली सारासार-विचारणा ||२||
होई-कृपाबळें लढला सत्संग |
सापडला मार्ग स्वानंदाचा ||३||
स्वामी म्हणे मज आकळलें गुज |
देखिले सहज आत्म-रूप ||४||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment