Monday, February 7, 2011

|| ॐ राम कृष्ण हरि ||

[ १ ]

भक्ताचे अंतरी सांवळा श्रीहरी |
सुखे वास करी सर्वकाळ ||१||
म्हणोनी तयासी विश्व हरि-रूप
झाले आपेंआप अखंडित ||२||
हरि-रूप काय हरि-रूप माया
हरि-रूप जाया-पुत्र-वित्त ||३||
हरि-रूप कर्म हरि-रूप धर्म |
भक्तीचे हे वर्म स्वामी म्हणे ||४||

[ 2 ]

कैंचा भक्त कैंचा देव |
हरि-रूप झाले सर्व ||१||
देव-भक्तां पडे मिठी |
अंतर्बाह्य जगजेठी ||२||
सर्वां ठायीं सर्वां घटीं |
हरि नांदे पाठीं पोटीं ||३||
एक झाले मी-तूं-पण |
स्वामी म्हणे भलें मौंन ||४||

No comments:

Post a Comment