[ १३ ]
भक्तांसी साचार विश्वाचा संसार
परि अहंकार नसे चित्ती ||१||
स्वयें विश्व-रूप होऊनी आपण
साधिती कल्याण जगताचें ||२||
मोक्ष-रूप हातीं घेउनी संपत्ती
जनालागीं देती भक्ती-पंथे ||३||
भक्तीचें भूषण मस्तकीं धारण |
करी नारायण स्वामी म्हणे ||४||
[ १४ ]
जीव-शिवाचा संयोग
हाचि माझा राज-योग ||१||
भेद-भाव हारपला |
हरि एकला संचला ||२||
दूर झाली आधि-व्याधी |
लागे अखंड समाधि ||३||
स्वामी बैसला स्व-स्थानीं
हरि-रूप ध्यानीं मनीं
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment