[ १६ ]
हरिपायीं लीन झालें माझें मन|
तेणें समाधान अखंडित ||१|
प्राणाचा प्रणव सहज पावन-जय
झाला गगनीं लय गगनाचा ||२||
गगनाचे पालवें गाळुनी घेतलें |
ते चि म्यां देखिलें पर-तत्व ||३||
स्वामी म्हणे गेला द्रष्टा-दृश्य-भाव |
कोंदाटला देव अंतर्बाह्य ||४||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment