[३४]
पूर्ण हरि-कृपा-बळे |
विश्व-रूप म्यां देखिले ||१||
आता ठेवूं कुठें पाय
हरि-रूप लोक-त्रय ||२||
रिता नाही कोठें ठाव
जेथे पाहें तेथें देव ||३||
स्वामी हरिसी अभिन्न |
अवघा हरि परिपूर्ण ||४||
[३५]
कर्म तैसें फळ लाभतें केवळ |
आणिकातें बोल लावूं नये ||१||
पेरोनियां साळी गव्हाचें तें पीक |
घ्यावया नि:शंक धावूं नये ||२||
उत्तरासारखे येते प्रतुत्तर |
करावा विचार आपणापाशी ||३||
पहावें तें दिसे दर्पणीं साचार |
आपुला आचार ओळखावा ||४||
स्वामी म्हणे होसी सर्वथैव जाण
तुझा तूं कारण सुख-दु:खा ||५||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment