बैसोनी एकांती करी सोऽहं ध्यान
तेणे तुझे मन स्थिरावेल
सोऽहं सोऽहं ऐसा शब्देविण
जप होता आपेआप चित्तशुद्धी
कैसा शब्दे विण होतो सोऽहं ध्वनि
घेई विचारोनी संतापासी
स्वामी म्हणे जाई संतासी शरण
तेणे उद्धरण होय तुझे
--स्वामी स्वरूपानंद